अंघोळ करताना तो तिला जाळीतून बघायचा..जाब विचारताच त्याने दिली ॲसिड फेकण्याची धमकी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२२ । अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्यानंतर महिलेला एकाने खिडकीच्या जाळीतून तिच्याकडे वाईट नजरेने बघून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे गेल्या आठ वर्षांपासून हा संशयित या महिलेचा वाईट नजरेने बघून विनयभंग करत होता. दि. २ जून रोजी हा प्रकार सहन न झाल्याने पीडितेने याप्रकरणी शहर पोलीसांत फिर्यादी दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2022 06 03T140339.172 jpg webp

शहरातील एका भागात ४० वर्षीय अविवाहित महिला या एकट्याच राहतात. तिची आई मुंबई येथे भावाकडे राहते. महिला ही शहरातील एका कुरीअर सेंटर येथे अकाऊंटंट म्हणून नोकरीला आहे. महिलेच्या घराजवळ विजय विनायक काळसकर (वय ६२) हा देखील राहतो. गेल्या साते ते आठ वर्षांपासून विजय काळसकर हा महिला बाथरूमध्ये अंघोळीसाठी जात असताना बाथरूमच्या जाळीतून वाईट उद्देशाने पाहत असतो. याबाबत अनेकवेळा महिलेने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. परंतू संशयिताने महिलेच्या तोंडावर ॲसिड फेकण्याची धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार २ जून रोजी सायंकाळी ४ वाजता संशयित आरोपी विजय काळसकर याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now