⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | शासकीय योजनांच्या मेळाव्याचा हजारो नागरीकांनी घेतला लाभ

शासकीय योजनांच्या मेळाव्याचा हजारो नागरीकांनी घेतला लाभ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने यावल येथील तहसील कार्यालयात कायदेविषयक जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यास यावल, चोपडा, फैजपूरसह इतर भागातील हजारो नागरीकांनी उपस्थित राहून शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर शेकडो नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणही करुन घेतले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रामीण भागातील नागरीकांना शासकीय योजनांची माहिती व्हावी, या योजनांचा लाभ मिळावा, नागरीकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी याकरीता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन जळगावचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष न्या. एस.डी. जगमलानी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे, सचिव ए.ए.के.शेख, फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग, यावलचे तहसीलदार एम.के. पवार, गटविकास अधिकारी भाटकर, यावल तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे चेअरमन एम.एस भारंचे, यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक एस.बी. पाटील आदी उपस्थित होते.

याठिकाणी शासनाच्या महसुल, नगरपालिका, क्रीडा, महिला व बालविकास, कृषी, आरोग्य, ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षण, विविध राष्ट्रीयकृत बँका, आपत्ती निवारण कक्ष, जिल्हा पोलीस दल, वाहतुक शाखा, परिवहन विभाग, आदिवासी विकास विभाग, समाजकल्याण विभागा यासह इतर २८ विविध विभागांचे माहितीपूर्ण स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला भेट देणाऱ्या नागरीकांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येत होती. त्याचबरोबर पात्र लाभार्थ्यांना आवश्यक दाखले त्याच ठिकाणी देण्यात आले. मेळाव्यात आरोग्य विभागामार्फत कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते याचा शेकडो नागरीकांनी लाभ घेतला. या मेळाव्यास विविध तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.