---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

मनपातील ‘ते’ २७ बंडखोर नगरसेवक लवकरच होणार अपात्र ?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२३ । मनपातील सत्तांतरावेळी भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंडखोरी करून शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन यांना मतदान करून शिवसेनेची जळगाव महापालिकेत सत्ता आणली होती. या विरोधात भाजपने विभागीय आयुक्तांकडे या बंडखोर नगरसेवकांना अपात्र करण्यासर्ंभात दाखल याचिकेवर लवकरच निकाल लागण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

jalgoan mnp

त्यामुळे या २७ नगरसेवकांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार असून महापालिकेच्या राजकीय वर्तूळात मोठ्या राजकीय घडामोडी जळगावकरांना पाहण्यास मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

महानगर पालिकेतील भारतीय जनता पार्टीचे २७ नगरसेवकांनी बंडखोरी करून शिवसेनेच्या महापौरांना मतदान केले. त्यामुळे भाजपने या बंंडखोर नगरसेवकांवर अपात्रेची कारवाई करण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेवर विभागीय आयुक्तांकडे कामकाज सुरू असतांना भाजपचे बंडखोर २७ नगरसेवकांवर कारवाई होवू नये म्हणून महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सर्वोच्चन्यायालात विभागीय आयुक्तांकडे आव्हाण देणारी याचीका दाखल केली होती.

---Advertisement---

जो पर्यंत अधिकृत गटनेता कोण याचानिकाल लागत नाही, तो पर्यंत विभागीय आयुक्तांनी २७ नगरसेवकांना अपात्र करण्याचे निर्णय देवू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नाशिक विभागीय आयुक्तांना दिले होते. मात्र भाजपचे तत्कालीन गटनेते भगत बालाणी यांनी राजिनामा दिल्यामुळे सवोच्चन्यायालयात महापौरांनी दाखल केलेली याचिका ही रद्द होईल व विभागीय आयुक्तांना देण्यात आलेली स्थगिती रद्द होईल असे तर्क लावले जात आहेत.

पर्यायी विभागीय आयुक्तांकडून २७ नगरसेवकांवर अपात्र होण्याचा मार्ग मोकळा होईल आणि २७ नगरसेवकांचा निकाल आठवडा भरात लागेलं असे म्हटले जात आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---