अशफाक शेख सलीम यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून संबंधीतांवर कठोर कारवाई करा
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२३ । अमळनेर येथील अशफाक शेख सलीम यांच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करून संबंधीतांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांची भेट घेऊन केली.
अमळनेर दंगल प्रकरणी १० ते १४ जून या कालावधीमध्ये पोलीस कोठडीत असलेला अश्फाक शेख सलीम याचा काल शासकीय रुग्णालय जळगाव येथे मृत्यू झाला. या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक रामदास वाकडे, सहा पो नी राकेश सिंह परदेशी व सोबत असलेले पोलीस कर्मचारी अमळनेर पोलीस स्टेशन यांना निलंबित करून सीआयडी चौकशी त्वरित पूर्ण करा या आशयाची तक्रार घेऊन जळगाव शहर व अंमळनेर येथील शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक यांना साकडे घातले.
पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी शिष्टमंडळाचे सर्व ऐकून याप्रकरणी सीआयडी चौकशी होणार असून त्या चौकशीत व पोस्टमार्टम रिपोर्ट प्रमाणे जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
शिष्टमंडळाने आपल्या चार पानी निवेदनात सविस्तर अशी मांडणी करून घटना विशद केली असून त्यात मुख्य ३ मागण्या केल्या आहेत.
१) एफ आय आर क्रमांक २१४/२३ यात एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनाच आरोपी करण्यात आले असून त्याबाबत चौकशी करून ज्यांचा संबंध नाही त्यांना त्वरित सोडण्यात यावे.
२) अश्फाक शेख सलीम याच्यावर पायाची शस्त्रक्रिया झाली असल्याने तो घरात असताना त्याला घरातून मारून झोडपून घेऊन गेले.
३) १३ जूनला त्याची प्रकृती बिघडल्यामुळे अमळनेर हुन जळगावला दवाखान्यात आणताना सुद्धा त्यांच्या घरच्या लोकांना कुटुंबीयांना येऊ दिले नाही व त्या दुसर्या दिवशी तो मरण पावला त्यामुळे मृतक ची आई श्रीमती सबनूर बी शेख सलीम यांनी गुरुवारी दाखल केलेल्या तक्रारीवरून पो नो रामदास वाकडे, सहा पो राकेश सिह व कामगिरीवरील पोलीस यांना त्वरित निलंबित करा अशा मागण्या करण्यात आलेल्या आहे
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
प्रतिभा शिंदे, सुमित्र अहिरे, सचिन धांडे, मुकुंद सपकाळे, सचिन अहिरे, फारुख शेख योगेश बाविस्कर, अजिज सालार, नदीम मलिक, रियाज बागवान, रयान जागीरदार, मजहरखान, अनिस शहा, अनवरखान, फिरोज शेख,यासिन मुलतानी, वसीम खान, रऊफ खान तर अंमळनेरचे रियाजुद्दीन उर्फ मौलाना,अब्दुल रज्जाक, मेहराज अलाउद्दीन शेख, हसन अली मोहम्मद अली, जळगाव चे सईद शेख, मुजाहिद खान, रफिक शेख, आदींचा समावेश होता.