जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ थांबेना! दोन बंद घरे फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

डिसेंबर 5, 2025 3:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या घटना सातत्याने समोर येत असून चोरट्यांना खाकीचा धाकच शिल्लक नसल्याचं दिसतंय. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच शहरातील पिंप्राळा शिवारातील सोनी नगर भागात चोरट्यांनी दोन बंद घरे फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घसरला कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी १ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

chalisgaon gharfodi 44 thousand

सोनी नगरात राहणारे गणेश भगवान माळी हे ३० नोव्हेंबर रोजी सहकुटुंब मूळ गावी गेले होते. ४ डिसेंबर, गुरुवारी सकाळी शेजारी राहणाऱ्या आशा भोई यांनी माळी यांना फोन करून त्यांच्या घराचा दरवाजा तुटलेला असल्याची माहिती दिली. माळी कुटुंबियांनी तात्काळ घरी धाव घेतली. चोरट्यांनी त्यांच्या घरातून ३ तोळे सोन्याच्या बांगड्या, १० ग्रॅमचे मणी मंगळसूत्र आणि ६ ग्रॅमचे कानातील टॉप्स असा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी त्याच गल्लीतील सुनिल रामदास सुरवाडे यांचेही बंद घर फोडले. सुरवाडे यांच्या घरातून चोरट्यांनी २५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पहाटेच्या सुमारास तोंडाला मास्क व रुमाल बांधलेले चार संशयित चोरटे कैद झाले आहेत. एकाच रात्री दोन घरे फोडल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now