⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | कासारखेड्यात एकाच रात्री मंदिरासह ४ ठिकाणी चोरट्यांचा डल्ला

कासारखेड्यात एकाच रात्री मंदिरासह ४ ठिकाणी चोरट्यांचा डल्ला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । यावल तालुक्यातील कासारखेडा गावात शनिवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोडी केली. यात मंदिरासह दुकान व दोन बंद घरांचा समावेश आहे. या घरांमधील रहिवासी बाहेरगावी गेले असल्याने घरातून किती मुद्देमाल चोरीस गेला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घरफोडीची माहिती मिळताच पोलिस पथकासह दाखल झाले. त्यांच्या वतीने संबंधित कुटुंबांना माहिती देण्यात आली.

कासारखेडा येथील निंबा पुना कुंभार व सुकलाल मिस्त्री हे कुटुंबासह घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले आहेत. रविवारी सकाळी नागरिकांना त्यांच्या घरांचे दरवाजे उघडे दिसले. पाहणीनंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे समजले. त्याचप्रमाणे गावातील श्री तुकाराम महाराज मंदिरातील दान पेटी देखील फोडलेल्या अवस्थेत दिसून आली. तसेच गावातील मोना इलेक्ट्रॉनिक या दुकानामध्येही चोरी झाल्याचे उघड झाले. त्यामुळे गावात एकाच रात्री चार ठिकाणी चोरी झाल्याची माहिती नागरिकांनी येथील पोलिसांना दिली.

पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले, गणेश ढाकणे, संदीप सूर्यवंशी, रोहिल गणेश यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चाेरी झालेल्या या चारही ठिकाणांची पाहणी केली. मंदिराच्या दानपेटीतून किती रक्कम लांबवली हे मात्र समजू शकले नाही. तर दाेन्ही कुटुंबे घरी परतल्यावर घरातून काय व किती चोरी झाली आहे, हे स्पष्ट होईल. मात्र, एकाच रात्री गावात चार ठिकाणी चोरी झाल्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह