जळगाव शहरात अपघाताची मालिका सुरूच: भीषण अपघातात महिलेचा मृत्यू

डिसेंबर 20, 2024 12:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२४ । जळगाव शहरात अपघातांची मालिका सुरूच असून अशातच आणखी एका भीषण अपघाताची घटना समोर आलीय. हा अपघात शहातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर आज शुक्रवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास घडला. वंदना अशोक गोराडे (वय ५५) असं अपघातातील मृत महिलेचं नाव असून याप्रकरणी पोलिसांनी ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतले आहे.

accident erandol jpg webp

पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील रहिवासी अशोक सुकदेव गोराडे (वय ६०) हे दुचाकी (एमएच.१९.डीजे.४७९६) वरून त्यांच्या शालकाच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी चांदसर कामतवाडी गावी जात असताना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर ट्रक (एमएच.२१.एबी.७४६६) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात वंदना गोराडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अशोक गोराडे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच टॉवर चौकात कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी त्वरित धाव घेतली. पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे. मयत वंदना यांना एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now