चिअर्स : चोरट्यांनी ‘आनंद’ बार फोडला, महागड्या दारूसह ४ लाखांच्या मालावर साधला डाव

जुलै 7, 2022 11:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । यावल तालुक्यातील अकलुद शिवारातील आनंद परमिटरूम बिअरबारमध्ये चोरट्यांनी डाव साधून महागड्या दारूसह ४ लाखांच्या मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार दि.५ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमार उघडीस आला. याबाबत बिअरबारच्या मालकांनी फैजपूर पोलिसांत तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime yawal jpg webp

नितीन प्रल्हाद पवार (वय ४० रा. नालन्दानगर ता, भुसावळ) यांनी पोलिसांत तक्रार दिली. यांचे यावल तालुक्यातील अकलुद शिवारात आनंद नावाचे परमिटरूम बिअरबार आहे. या बारमध्ये अज्ञात चोरट्यांनी डाव साधला. दरम्यान, विदेशी दारूच्या महागड्या क्वार्टर, बिअर बाटल्या, सीसीटीव्ही डीआर मशीन, मॉनिटर एन्व्हटर मशीन, लहान बॅटरी मशीन, इंटरनेट राउटर मिस्कर, मिस्कर भांडी, इलेक्ट्रिक शेगळी व जेवणाचा प्लेटा असा एकूण ३ लाख ९० हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

नितीन पवार हे आपल्या बिअरवर गेले असता हा प्रकार उघडीस आला. त्यांनतर पवार यांनी फैजपूर पोलिसांत याबाबत तक्रार दिली. घटनास्थळी उपविभाग फैजपूर कुणाल सोनवणे, गणेश धुमाळ यांनी भेट दिली. त्यानुसार भादंवि कलम ४५७,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now