जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । कजगाव येथील धर्मा ओंकार महाजन व बापू भगवान चौधरी यांच्या पारोळा रस्त्यावरील शेडमधून चोरट्यांनी चक्क ७५ शेळ्या चोरून नेल्याचा प्रकार २९ रोजी मध्यरात्री घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुमारे सात लाखांचे पशुधन चोरीला गेल्याने पशुपालकांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी टायरच्या खुणा आढळल्या. त्यामुळे चोरट्यांनी शेळ्या वाहनात नेल्या असाव्या, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेनंतर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी भडगावचे पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांना निवेदन दिले. चोरीचा तपास आठ दिवसात पूर्ण करून, चोरट्यांना जेरबंद करावे. अन्यथा बस्थानक परिसरात रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. काँग्रेसचे दिनकराव पाटील, शिवसेना तालुका संघटक अनिल महाजन,भाजप वैद्यकीय आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ.संजय पाटील, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व माजी पंचायत समितीचे सदस्य अशोक सोनवणे आदी उपस्थित होते. याप्रकरणी भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. कजगाव मोठे बाजारपेठेचे गाव असल्याने या ठिकाणी पोलिस मदत केंद्र आहे. मात्र, तेथे पोलिस नसतात. त्यामुळे पोलिस मदत केंद्र उपयोगशून्य असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
हे देखील वाचा :
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- Breaking : जळगावात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात
- बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा हृदयविकाराने मृत्यू ; यावल तालुक्यातील दुर्दैवी घटना
- धक्कादायक ! जळगाव शहरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबारीची घटना
- ऑनलाईन नंबर शोधणे पडले महागात; तरूणाला १० लाखात गंडविले