जळगावात बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविला ५४ हजाराचा ऐवज

फेब्रुवारी 18, 2022 10:12 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२२ । जळगाव शहरातील सिंधी कॉलनीजवळील कंवर नगरात बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी रोकडसह सोन्याच्या दागिने असा ५४ हजार ५०० रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना आज शनिवारी उघडकीस आली. हरीश खियलदास रावलानी (वय-५५) यांच्या घरी ही चारी झाली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, शहरातील सिंधी कॉलनीमध्ये हरीश रावलानी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव शहरातील बळीरामपेठ येथे कपड्याचे दुकान आहे. नुकतेच रावलानी यांनी गणपती नगरातील साकार अपार्टमेंट येथे नवीन फ्लॅट घेतला असल्याने जुन्या घरातून नवीन घरात सामान टाकण्याचे काम सुरू होते. १० जानेवारी रोजी त्यांनी काही सामान शिफ्ट केले होते. त्यानंतर ११ वाजता कंवर नगरातील घराला कुलूप लावून ते गणपती नगरातील घरी गेले. त्यानंतर शनिवारी १५ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता सिंधी कॉलनीजवळील कंवरनगरातील जुन्या घरी गेले असता त्यांना घरात दरावाजाचे कुलूप तोडलेले दिसून अले.

आत जावून पाहिले असता त्यांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आला. लोखंडी कापटातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि ३ हजार रुपयांची रोकड असा एकूण ५४ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी हरीष रावलानी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पो.नि. प्रत्ताप शिकारे यांनी भेट दिली. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी व योगेश बारी करत आहेत.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now