---Advertisement---
गुन्हे भडगाव

Bhadgaon : चोरीच्या दोन दुचाकीसह चोरटा जेरबंद

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । भडगाव पोलिसांनी वडजी येथील एका तरुणाला मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक केले असून या दुचाकी चोराकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात भडगाव पोलिसांना यश आले आहे. सत्यपाल दत्तात्रय निकम (रा.वडजी ता.भडगाव) असं दुचाकी चोरट्याचे नाव असून सदर संशयित चोरट्याने पाच गुन्हे केल्याची कबूल दिली.

duchaki chor

याबाबत असे की, २४ जानेवारी २०२५ रोजी भडगाव शहारातून बाळद रोड येथील फिर्यादी यांच्या महाराष्ट्र बॅटरी नावाच्या दुकानासमोरुन फिर्यादीची १० हजार रुपये किमतीची एक बजाज कंपनीची सी.टी. १०० लाल रंगाची मोटार सायकल क्र. एम.एच.१९.ए.एन.१०९६ अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. याप्रकरणी शेख मुनाफ शेख युसुफ (वय ३५, रा.हकीन नगर, भडगाव) यांचे फिर्यादवरुन अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

---Advertisement---

भडगांव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सदर गुन्ह्यातील मोटार सायकल ही सत्यपाल दत्तात्रय निकम याने चोरुन नेली. भडगाव पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडे गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटर सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर आरोपीने पाच गुन्हे केल्याची कबूल दिली अटकेत असतांना इतर ठिकाणावरुन अजुन एक मोटर सायकल अशा दोन मोटर सायकल चोरी केल्याची पोलीस कस्टडीमध्ये कबुली दिल्याने सदरच्या मोटर सायकली चोरीच्या गुन्ह्यात आरोपीने काढून दिल्याने त्या जप्त करण्यात आलेल्या आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, चाळीसगाव परिमंडळ, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल चाळीसगाव उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, स.फौ. प्रदीप चौधरी, पोहेकी निलेश ब्राम्हणकर, पोको सुनिल राजपूत, पोको प्रविण परदेशी यांनी केली असून गुन्हाचा पुढील तपास सफौ प्रदीप चौधरी हे करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment