ते बँकेत गेले, पासबुक घरी विसरले, पैसे देऊन घरी परतले अन् मृत्यूने त्यांना गाठले, पण..
vakoda news-जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२२ । आतापर्यंत आपण बँक खात्यात चुकून आलेले पैसे परत केल्याचे वाचले असेल. शिपाई पदावर काम करून सेवानिवृत्त झालेले दत्तात्रय किसन गुजर आपल्या बॅक खात्यात १० हजार रुपये जमा करण्यासाठी गेले मात्र, बँकेचे पास बुक घरी विसरले. त्यामुळे ते पैसे घरी न नेता त्यांनी तेथील ऑफसेट संचालकाला देऊन, पासबुक घेऊन आल्यावर रक्कम टाकून दे सांगून गेले मात्र, ते पुन्हा परत आलेच नाही. दोन दिवसांनी ऑफसेट संचालक यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून दत्तात्रय किसन गुजर यांची निधनाची बातमी मिळाली. त्यानंतर ऑफसेट संचालक यांनी या मयत व्यक्तीच्या नातेवाईकाना पैसे परत केले.
दत्तात्रय किसन गुजर हे वाकोद येथील रहिवासी आहेत. ते येथील स्व. राणीदानजी जैन व कांताबाई जैन उच्च माध्यमिक शाळेत शिपाई पदावरून सेवानिवृत्त झालेले होते. दत्तात्रय गुजर हे शिपाई पदावर असल्याने विद्यार्थी त्यांना आप्पा म्हणून बोलायचे, त्यामुळे दत्तात्रय गुजर हे सर्वाचे आप्पा होते. आप्पा दोन दिवसापुर्वी वाकोद येथील सोनाई ऑफसेट वर आपल्या बॅक खात्यात १० हजार रुपये जमा करण्यासाठी गेले. मात्र, बँकेचे पास बुक घरी विसरले. त्यांनी सोनाई ऑफसेट संचालक राहुल वानखेड़े या तरूणाकडे पैसे देऊन, पासबुक घेऊन आल्यावर रक्कम टाकून दे सांगून गेले मात्र, ते पुन्हा परत आलेच नाही.
दरम्यान, दोन दिवसांनी राहुल वानखेड़े यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून आप्पाच्या निधनाची बातमी कळाली. त्यांनतर राहुलने सोशल मिडियाच्या माध्यमातून आप्पानी आपल्याकडे १० हजार रुपये जमा करून गेल्याची माहिती दिली. तसेच नातेवाईकांनी संपर्क करून पैसे घेऊन जाण्याची विनंती केली. विशेष म्हणजे, राहूल आणि दत्तात्रय गुजर (आप्पा) यांच्यातील झालेल्या व्यवहाराची कोणाला ही माहिती नव्हती. तरीही राहुल ने आपला प्रामाणिक पणा दाखवून रक्कम परत देण्याचे आवाहन करून ते आप्पाच्या कुंटुबाला परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे सोशल मिडियावर आणि प्रत्येक्ष भेटून अनेकांनी राहुलचे कौतुक केले.