पक्ष विरोधी काम केले म्ह्णून एम.आय. एमच्या नागरसेवाकांना नोटीस

जळगाव लाईव्ह न्यूज | २६ एप्रिल २०२३ | महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेऊन भाजप उमेदवाराला मदत केल्याबद्दल एमआयएमच्या दोघा नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा बजावण्यात आली आहे.

यासंदर्भात जिल्हाध्यक्ष शेख अहमद आहे. हुसैन यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशान्वये पक्षाचे निरीक्षक खालिद शेख सईद यांनी रियाज बागवान व सईदा वी. शेख युसूफ यांना ही नोटीस बजावली आहे.

नगरसेवकांनी सईदाबी शेख युसूफ यांच्या नावाने नामनिर्देशन दाखल केले. तसेच ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागेही घेतला. त्यामुळे भाजपच्या नगरसेविका अंजनाबाई सोनवणे बिनविरोध निवडून आल्या यामुळे पक्षविरोधी काम केल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे.