जळगाव शहरमहाराष्ट्रराजकारण

येत्या महासभेत या विषयांवर होणार चर्चा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२३ । शासनाने शहरातील विविध भागांतील रस्ते कॉंक्रिटीकरणासाठी शंभर कोटींचा निधी दिला आहे. त्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला महापालिकेतर्फे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्यासाठी महासभेत चर्चा होणार आहे, तसेच भटक्या मांजराचे निर्बीजीकरण करण्यासह तब्बल ४१ विषयांवर चर्चा होणार आहे.

सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात मंगळवारी (ता. ३०) सकाळी अकराला महासभा होईल. महापौर जयश्री महाजन पीठासीन अध्यक्षपदी असतील. शहरात रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर समस्या आहे. मुख्य रस्त्यांसह अनेक भागांतील रस्त्यांची कामे न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. यासाठी शासनाने शंभर कोटींचा निधी दिला आहे.

रस्त्यांची कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मक्तेदार नियुक्त केला आहे. मात्र, त्यांना रस्त्यांची कामे करण्यासाठी महापालिकेने ‘ना हरकत’ प्रमाणपत्र द्यावयाचे आहे. याबाबत महासभेत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. भटक्या माजंराची संख्या कमी करण्यासाठी भटकी मांजरे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचा प्रस्तावही ठेवला आहे.

राज्य शासनच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट या संस्थेची नियुक्ती करण्याबाबत निर्णय होईल. शिवाय नगरसेवकांकडून आलेल्या प्रस्तावांवर चर्चा होईल. नगरसेवकांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये पूर्ण होत आहे. या पाश्‍र्वभूमीवर आपल्या प्रभागातील विकासकामे वेगाने होण्याकडे नगरसेवक लक्ष देत आहेत. त्यामुळे महासभेत ठेवलेल्या प्रस्तावांकडेही लक्ष आहे. शहरातील रस्त्यांचा प्रश्‍न महत्त्वाचा असून, त्याचे कामे वेगाने करण्याकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button