काय सांगताय अशी ऑफर कुठेच नाही, फक्त ७५ रुपयात सिनेमागृहात पाहता येईल कोणताही चित्रपट!
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । भारत देश दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. विविध सोशल मीडिया अँपवर नवनवीन चित्रपट, वेबसिरीज उपलब्ध आहेत. सिनेमागृहात १०० कोटींचा टप्पा गाठणारे चित्रपट आपला डंका गाजवीत आहे. सर्व काही सुरळीत असले तरी देशभरातील कितीतरी नागरिक असे आहेत ज्यांनी आजवर कधीच मल्टिप्लेक्सची पायरी चढली नाही अशा नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दि. १६ सप्टेंबर रोजी भारतात राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे. याच दिवशी प्रेक्षकाना केवळ ७५ रुपयात कोणताही चित्रपट बघता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊ नेमका विषय…
अमेरिकेत या आठवड्यात राष्ट्रीय चित्रपट दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. अमेरिकेत देखील ही एक दिवसाची ऑफर देण्यात येणार असून जवळपास ४ हजारहून अधिक सिनेमागृहांमध्ये लागू केली जाणार आहे. लोकांना थिएटरमध्ये जाण्यासाठी आणि मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा हा एक मार्ग आहे. अमेरिकेत केवळ ३ डॉलर एका सिनेमासाठी आकारले जाणार आहे.
मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने ट्विट करून जाहीर केले आहे की, शुक्रवार दि.१६ सप्टेंबर रोजी भारतात राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा करण्यासाठी, 4000 पेक्षा जास्त स्क्रीन असलेल्या सर्व सहभागी सिनेमांसाठी प्रति व्यक्ती प्रति तिकीट ७५ रुपये आकारले जाणार आहे. ऑफर INOX, PVR, Cinepolis, Carnival, M2K, Wave, Asian आणि इतरांसह देशभरातील नियमित थिएटर तसेच मल्टिप्लेक्सवर देखील लागू होणार आहे. हा एक दिवसाचा कार्यक्रम सर्व वयोगटातील प्रेक्षकांना चित्रपटांमध्ये एक दिवसाचा आनंद घेण्यासाठी एकत्र आणू शकेल.
कोरोनाची मरगळ असल्याने गेल्या दोन वर्षापासून चित्रपटगृहे बंद होते. प्रेक्षक आणि रसिकांचा मोठा हिरमोड झाला होता. दोन वर्षांनी चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट दिनाचे आयोजन केले जात आहे. हा उपक्रम मुख्यत्वे त्या चित्रपट पाहणाऱ्यांसाठी आहे ज्यांनी अद्याप त्यांच्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन चित्रपटाचा आनंद घेतलेला नाही. भारतात या वर्षी चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे.
वर्ष २०२२ मध्ये प्रदर्शित झालेले KGF: Chapter 2, RRR, विक्रम, भूल भुलैया 2, Doctor Strange in the Multiverse of Madness, आणि Top Gun: Maverick यांचा समावेश आहे. सप्टेंबरपासून, स्पायडर-मॅन: नो वे होम द एक्स्टेंडेड व्हर्जन सारखे चित्रपट थिएटरमध्ये दाखल होत आहेत आणि नुकतेच ब्रह्मास्त्र: भाग एक – रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अभिनीत देखील प्रदर्शित झाला आहे.
संघटनेने हे नमूद केले आहे कि, जर तुम्ही बीएमएस किंवा पेटीएम सारख्या ऑनलाइन पोर्टलवर तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला कर आणि शुल्काच्या रूपात अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. तुम्ही ऑफलाइन तिकीट खरेदी करता तेव्हाच ७५ रुपये लागू होतात. विशेष ऑफरचे अधिक तपशील लवकरच सहभागी सिनेमागृहे, त्यांच्या वेबसाइट्स आणि सोशल मीडिया हँडलवर उपलब्ध केले जाणार आहे.