⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | Theft : यावलमध्ये एकाच शेतातून दुसऱ्यांदा लांबवले वीज पंप

Theft : यावलमध्ये एकाच शेतातून दुसऱ्यांदा लांबवले वीज पंप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । यावल शहरातील शेत शिवारातील विहिरीतून चोरट्यांनी २४ हजार रूपये किंमतीचे दोन वीज पंप लांबवले. ही घटना बुधवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे दोन महिन्यात एकाच शेतातून दुसऱ्यांदा पंप चोरीला गेले. या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

तेजस सतीश यावलकर (रा.वाणी गल्ली, यावल) यांच्या यावल शिवारातील शेतात (गट क्र.१४७०) विहीर आहे. या विहिरीत त्यांनी टेक्स्मो कंपनीच्या १० एचपीच्या दोन मोटारी बसवल्या होत्या. बुधवारी सकाळी मजुराला हे दोन्ही पंप चोरीला गेल्याचे लक्षात आले. या मुद्देमालाची किंमत २४ हजार रूपये आहे. याप्रकरणी तेजस यावलकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास सहायक फौजदार नितीन चव्हाण करत आहे.

दरम्यान, २८ फेब्रुबारीच्या रात्री यावलकर यांच्या याच शेतीलगतच्या गोपाळ कोळी यांचे गटातील विहिरीतून दहा व साडेसात अश्वशक्तीचे ८० हजार रूपये किमतीचे दोन पंप चोरी झाले होते. याप्रकरणी दोन संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतले होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह