गुन्हेचाळीसगाव

बैलगाडीने वाळूची चोरी; दोन जणांविरोधात गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । बैलगाडीने वाळूची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या दोन जणांना मेहुणबारे पोलिसांनी पडले. त्यांच्याकडील बैलगाड्या जप्त करण्यात आल्या असून वाळूची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी येथील पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील जामदा शिवारातील गिरणा नदीपात्रातून वाळूची विनापरवाना वाहतूक करताना ११ एप्रिल रोजी सायकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मेहुणबारे पोलीसांनी दोन बैलगाडींना पकडले. त्यांच्याकडे वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. दोन्ही बैलगाडी मेहुणबारे पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले आहे. पोलीस कॉन्स्टेबल निलेश लेहार यांच्या फिर्यादीवरून बैलगाडीधारक अशोक भगवान महाले आणि सुरेश भगवान महाले दोन्ही रा. जामदा ता.चाळीसगाव यांच्याविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपाल पाटील करीत आहे.

Related Articles

Back to top button