घरात कुणीही नसताना प्रौढाने घेतला गळफास

ऑगस्ट 31, 2021 2:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीचे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडलीय. रविंद्र संभाजी चंदनशिव (वय-४५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत  पाळधी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime

पाळधी येथील रविंद्र चंदनशिव हे पत्नी मंगलाबाई, मुलगा पवन आणि लहान मुलगी पलक यांच्यासह राहतात. ते बांधकाम करण्याचे काम करतात. काल सोमवारी ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास राहत्या घरात कुणीही नसताना छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या केल्याचे नेमके कारण कळू शकले नाही.

सायंकाळी पत्नी मंगलाबाई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now