⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

सप्तशृंगी मातेच्या मंदिरात ५२ हजारांची चोरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । पारोळा तालुक्यातील जोगलखेडे येथे महेंद्र पाटील यांनी त्यांच्या शेतात गट नंबर १२९ मध्ये लोकसहभागातून सप्तशृंगी मातेचे मंदिर बांधले आहे.

१४ राेजी रात्री दानपेटी मंदिराबाहेर नेऊन चाेरट्यांनी दानपेटी फोडून पैसे लांबीवले त्या दानपेटीत भाविकांनी दान केलेले ५० हजार रोख तर दोन हजार रुपयांच्या दागिन्यांची रक्कम चाेरट्याने चोरी केली आहे. महेंद्र पाटील हे १५ रोजी पहाटे ४.३० वाजता मंदिर उघडण्यासाठी गेले असता त्यांना चाेरी झाल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे या पूर्वीही दोन वेळा याच मंदिरात चोरी झाल्याचे ग्रामस्थांनी संगितले.