यावल शिवारातून केबल वायरची चोरी

एप्रिल 11, 2022 12:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । यावल येथील टेंभीकुरण भागातील शेतातून चोरट्यांनी ६ हजार रूपये किंमतीची केबल लांबवली. हा प्रकार रविवारी उघडकीस आला. या प्रकरणी येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

crime

अधिक माहिती अशी की, शिवाजी नगर भागातील रहिवासी देविदास शंकर सूर्यवंशी यांनी टेंभीकुरण भागातील शेत बटाईने केले आहे. या शेतात केळी लावली असून कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा करतात. रविवारी या कूपनलिकेची ३० फूट लांबीची थ्री फेज पट्टा केबल व कॉपर कंडक्टर ४ एमएम हे साहित्य भामट्याने लांबवले. या साहित्याची किंमत ६ हजार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now