चोरट्यांचा उच्छाद थांबेना ! मुक्ताईनगरात बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लांबविला..

फेब्रुवारी 23, 2026 6:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड वस्ती बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्याचे दागिने व रोख रकमेसह सुमारे २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास लंपास केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरलेअसून या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

chalisgaon gharfodi 44 thousand

याबाबत असे की, पुरनाड वस्ती (ता. मुक्ताईनगर) येथील लक्ष्मण गोविंद दगडे (वय ४२) हे आपल्या कुटुंबासह राहतात. २२ फेब्रुवारीच्या पहाटे १ ते १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील लाकडी दरवाजाला होल पाडून आतील कडी उघडली. चोरट्यांनी घरात प्रवेश करून लोखंडी पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. एकूण २,४२,००० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

Advertisements

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करत आहेत. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now