जळगावच्या सुपुत्राला दादासाहेब फाळके पुरस्कार ; बॉलिवूडमध्ये ‘रायझिंग स्टार’ म्हणून गौरव

फेब्रुवारी 23, 2026 9:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावसाठी अभिमानाची बाब म्हणजे शहरातील एका होतकरू तरुण स्वप्नील शिंदेला दादासाहेब फाळके पुरस्कार (रायझिंग स्टार इन बॉलिवूड) प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मोनिका बेदी यांच्या हस्ते सहारा स्टार मुंबई येथे आयोजित भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

dadasahebfadke award

कल्पना शिंदे आणि रामकृष्ण रामदास शिंदे (माजी लाईन चेकिंग ऑफिसर, जळगाव) यांचे सुपुत्र असलेल्या या तरुणाने आपल्या कुटुंबाचे आणि जळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. साध्या कुटुंबातून येऊनही त्यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले.

इंजिनिअरिंग आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवली असून सध्या ते पुण्यातील एका अग्रगण्य कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी आपल्या अभिनयाच्या आवडीला जोपासले आणि स्वप्नांच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली.

त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि मेहनतीला आता राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून बॉलिवूडमध्ये ‘रायझिंग स्टार’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांच्या यशस्वी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

पुरस्कार स्वीकारताना त्यांनी आपल्या आई-वडिलांचे आणि सर्व शुभेच्छुकांचे आभार मानले. “हा पुरस्कार माझ्या कुटुंबाचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे,” असे त्यांनी सांगितले. जळगाव शहर त्यांच्या या यशाचा अभिमान बाळगत असून तरुणांसाठी ते एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now