लग्नापूर्वीच तरुणीने संपविले जीवन

ऑक्टोबर 16, 2022 1:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२२ । यावल तालुक्यातील अंजाळे येथील २३ वर्षीय तरुणीने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, या तरुणीचे लग्न जुळले होते व विवाह दिवाळी नंतर होणार होता अशी माहीती मिळत असून लग्न जवळ आलेल्या तरुणीने आत्महत्या केल्याने गावात शोककळा पसरली आहे. याबाबत यावल पोलीस स्टेशन मध्ये अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली.

jalgaon 2022 10 16T131307.164 jpg webp

मिनल निवृत्ती भागवत (वय २३, रा.अंजाळे , यावल ) या तरुणीने दि. १५ आक्टोबर २o२२ रोजी सकाळी १oवाजेच्या पुर्वी आपल्या राहत्या घरातील छ्ताच्या लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. या बाबत मयत तरूणीचे वडील निवृत्ती किसन भागवत वय ५८ यांनी खबर दिल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये अ.मृ .र ६५ / २०२२ प्रमाणे अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी हे करीत आहे.

दरम्यन, सदरच्या आत्महत्या केलेल्या तरुणीचे लग्न जुळले होते व विवाह दिवाळी नंतर होणार होता अशी माहीती मिळत आहे. विवाहची वेळ जवळ आली असता तरुणीने आत्महत्या का केली असावी असा प्रश्न उपस्थित होते. मयत तरूणीचे मृतदेह यावलच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ . राजेश पवन जैन यांनी केली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now