⁠ 
शनिवार, मे 11, 2024

हिवरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पाचोऱ्याचा तरुण गेला वाहून

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । काल जिल्ह्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी नाले-नद्यांना पूर आला. दरम्यान, पाचोरा शहरातून वाहत जाणाऱ्या कृष्णापुरी येथील हिवरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात एक तरुण वाहून गेल्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली. देवेंद्र धनराज शिंपी (वय – ४०) असे या तरुणाचे नाव असून तालुका प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू आहे.

याबाबत असे की, जिल्ह्यात काही ठिकाणी मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक नद्या-नाल्यांना पूर आला आहे. पाचोरासह परिसरात देखील जोरदार पाऊस झाला. यामुळे कृष्णापुरी येथील हिवरा नदीला पूर आला. यादरम्यान, पाचोरा येथील कृष्णापूरी भागात राहणारा देवेंद्र शिंपी हा आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातून कृष्णापुरीकडे जाण्याच्या प्रयत्नात असतांना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना घडली आहे.

नदी पार करून जाणे अडचणीचे असतांना देवेंद्र शिंपी हे रात्री शहरातच नातेवाईकांकडे मुक्कामी थांबले होते. मात्र सकाळी घरी परत येत असतांना ही घटना घडली असल्याचे प्रथमदर्शनींनी सांगितले. देवेंद्र शिंपी सकाळी सुमारे ६ :३० च्या सुमारास गावातून घराकडे शिव कॉलनी, कृष्णापुरी कडे येत असतांना पुलावरील पाणी अचानक पाणी वाढल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे देवेंद्र शिंपी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान इसमाचा मृतदेह शोध कार्य सुरू असून घटनास्थळी तहसिलदार कैलास चावडे, न. पा. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी पाहणी करून कर्मचाऱ्यांना पुढील सुचना दिल्या असुन परिसरातील जनतेने खबरदारी घेण्याचे आवाहन ही यावेळी करण्यात आले आहे.