लग्न जुळत नसल्यामुळे तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

मार्च 25, 2022 11:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२२ । वयाची तिशी ओलांडत चालली तरी पण लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याच्या कारणाने एका ३० वर्षय तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात घडली आहे. चेतन खरोटे (वय 30) असं या तरुणाचं नाव आहे.

chetan kharote succied jpg webp

काय आहे नेमका प्रकार?

चेतन खरोटे हा कुटुंबियांसह नशिराबाद येथे वास्तव्यास आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी चेतन खरोटे हा त्याच्या आईला वारंवार लग्न होत नसल्याचा तगादा लावीत होता. याच विवंचनेत असलेला चेतन गेल्या तीन दिवसांपासून व्यसनाच्या ही जास्त आहारी गेला होता. यामुळे चेतनची आई देखील गेल्या दोन-तीन दिवसांपासून आपल्या नातेवाईकांकडे निघून गेली होती. ही संधी साधत चेतनने घर आतून बंद करून घेतले आणि घराच्या छतावरील कडी-कोयंड्याला दोरी बांधून आपली जीवन यात्रा संपवली.

बराच वेळ झाला तरी घरातून कुणी बाहेर येत नसल्यामुळे शेजाऱ्यांना संशय बळावला. त्यांनी त्यांच्या आईला माहिती दिली. तेव्हा घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता चेतनने आत्महत्या केल्याचे आढळून आले.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि चेतनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. लग्न होत नसल्यामुळे चेतनने पाऊल उचलल्यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्याच्या मृत्यूबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत नशिराबाद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now