महिला घरात झोपली, चोरट्यांनी खिडकीतून हात टाकत गळ्यातील मंगळसूत्र चोरले!

सप्टेंबर 1, 2022 1:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२२ । महिला घरात झोपली असताना चोरट्यांनी खिडकीतून हात टाकत गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon crime 8 jpg webp

ललिता अरुण चव्हाण (वय ४०, रा.शाहूनगर भडगाव रोड चाळीसगाव) यांनी चाळीसगाव शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. ललिता चव्हाण या दि.३१ ऑगस्ट रोजी त्यांच्या घरात झोपल्या असताना रात्री ४.३० वाजेच्या सुमारास अज्ञात भामट्यानी खिडकीतून हात टाकून गळ्यातील १० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले.

या प्रकरणी फिर्याद ललिता चव्हाण यांनी चाळीसगाव शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अभिमन पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now