Pachora : प्रेमविवाह करून संसार थाटला! पण पतीकडून चारित्र्याचा संशय, पत्नीने उचललं टोकाचं पाऊल..

ऑगस्ट 5, 2025 12:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा शहरातील नंदनवन सिटी येथून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. ज्यात दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केलेल्या विवाहितेने पतीच्या जाचाला कंटाळून गळ#$ फास घेऊन जीवन#$ यात्रा संपविली. माधुरी विशाल सोनवणे (पाटील) असे मृत विवाहितेचे नाव याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये पती विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

crime

माधुरी सोनवणे यांनी दोन वर्षांपूर्वी २०२३ मध्ये विशाल मुरलीधर सोनवणे याच्याशी प्रेमविवाह केला होता. विशाल याने खाजगी नौकरी करुन आपला संसार थाटला. लग्नानंतर काही दिवस चांगला संसार चालल्यानंतर विशाल हा माधुरीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत तिला मारहाण करु लागला. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने माधुरी हिने मेडिकल स्टोअर मध्ये नौकरी करुन संसाराचा गाडा ओढण्यास विशाल यास मदत करु लागली.

लग्नानंतर काही दिवस चांगला संसार चालल्यानंतर विशाल हा माधुरीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत तिला मारहाण करु लागला. होणाऱ्या या त्रासाला कंटाळून विवाहितेने जीवन#$ यात्रा संपविली. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये पती विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now