जळगावात धावत्या बसचे मागचे चाक निखळले ; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

ऑगस्ट 8, 2024 2:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२४ । राज्यातील एसटी महामंडळाच्या अनेक बसची दयनीय अवस्था झाली असून अनेक प्रवाशांना जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागतोय. अशातच जळगाव जिल्ह्यातील एक मोठी घटना समोर आलीय. धावत्या एसटी बसचे मागील एक चाक निखळयाची घटना कजगाव ते भडगाव मार्गावरील साईबाबा मंदिराजवळ घडलीय. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला आहे.

Bus accident 1 jpg webp

या घटनेबाबत असे की, मलकापूर ते विठ्ठलवाडी जाणारी एसटी बस (एमएच- २०, बीएल ३२९६) ही कजगाव ते भडगाव मार्गावरील साईबाबा मंदिराजवळ आल्यानंतर बसचे मागील एक चाक निखळून पडले. तर लगेचच दुसऱ्या चाकाचे टायर फुटले. यामुळे बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस एका बाजूला धावू लागली. परंतु, चालकाने समय सूचकता दाखवत बस थांबवली. बस एका बाजूला झुकताच प्रवाशांचा आक्रोश व रडारड सुरु झाली होती. परंतु, बस थांबताच प्रवाशी काही मिनिटातच खाली उत्तरले.

खाली उतरल्यावर त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. बसमध्ये एकूण ७७ प्रवाशी प्रवास करत होते. सोबतच चालकाचेही त्यांनी आभार मानले. काही वेळानंतर वाहक व चालक यांनी भडगावकडून येणाऱ्या बसमध्ये पुढील प्रवासासाठी या प्रवाशांना मार्गस्थ केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now