अनोळखी प्रेताची पोलिसांच्या कामगिरीमुळे पटली ओळख!
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२२ । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर राजलक्ष्मी हॉटेल च्या बाजूला पाटचारीच्या पाण्यात तरंगताना ३० ते ३५ वयाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह मंगळवारी २६ जुलै रोजी आढळून आला. त पोलीस उपनिरीक्षक शरद बागल .काशिनाथ पाटील .अनिल पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व तत्परतेने तपासाचे चक्रे फिरून मूर्त व्यक्तीची ओळख पटवण्यास यश मिळवले. मृतदेह हा जळगाव येथील सम्राट कॉलनी मधील रहिवासी कैलास ओंकार माळी यांचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या या तत्पर कामगिरीमुळे अवघ्या तीन ते चार तासात अनोळखी प्रेताची ओळख पटली.
विखरण येथील पोलीस पाटील विनायक पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला सदर घटनेबाबत माहिती दिल्यावरून पीएसआय बागल आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले व मूर्तदेह बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली मात्र प्रेताची ओळख पटत नव्हती म्हणून अंगावरचे कपडे काढून मूर्त देहाचे छायाचित्र काढण्यात आले. प्रेताच्या उजव्या हातावर बदामाच्या आकाराचे लव असे चिन्ह आढळून आले. कैलास असे नाव हातावर गोंदवलेले होते. बागल यांनी मुंबई येथे क्राईम ब्रँच ला काम केले असल्याने त्यांच्या अनुभवातून त्यांनी ऑल इंडिया पोलीस मिसिंग पर्सन या ग्रुपवर सदर घटनेची माहिती शेअर केली. जळगाव येथील एका गोपनीय सूत्रधाराने सदर अनोळखी इसमा बाबत माहिती दिली. त्यानुसार कैलास ओंकार माळी असे अनोळखी इसमाचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. माळी हा भाजीपाला विकून उदरनिर्वाह करीत होता. तो विवाहित असून त्याची पत्नी नांदत नव्हती असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याच्या पश्चात आई व एक भाऊ असा परिवार आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान एरंडोल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर कैलास पाटील यांनी मूर्त देण्याचे शवविच्छेदन केले नंतर मूर्तदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.