⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

बांधकामासाठी तीन लाख आणले नाही म्हणून विवाहितेचा छळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । माहेरहून तीन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा वेळोवेळी छळ करण्यात येत असल्याने पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहिता माधुरी पवन धनगर (वय-२१) यांचा विवाहित कोल्ह ता.पाचोरा येथील पवन बाबूलाल धनगर यांच्याशी मार्च २०२१ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले, त्यानंतर मात्र पती पवन धनगर याने विवाहितेला लहान-सहान कारणांवरून टोमणे मारणे सुरु केले. त्यानंतर घराच्या बांधकामासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे, यासाठी तगादा लावला. विवाहितेच्या आई-वडिलांचे परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ३ लाख रुपये देऊ शकले नाही. या कारणावरून पती पवन धनगर याने शिवीगाळ करून मारहाण केली तर पैसे आणले नाही म्हणून सासू आणि सासरे यांनी विवाहितेला घरातून हाकलून दिले.

पीडित महिला रामेश्वर कॉलनी येथील माहेरी निघून आल्या. शुक्रवार २९ एप्रिल रोजी सायंकाळी विवाहितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन रितसर तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पती पवन बाबूलाल धनगर, सासु कल्पना बाबूलाल धनगर, सासरे बाबूलाल महादू धनगर सर्व रा. कोल्ह ता. पाचोरा जि. जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील हे करीत आहेत.