जामनेर तालुक्यातील सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मे 20, 2021 12:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ ।  सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या २१ वर्षीय युवकाने राहत्या घरातच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना १९ रोजी जामनेर तालुक्यातील शिंगाईत येथे घडली.  चेतन धनराज भोई असे युवकाचे नाव आहे. आत्महत्यामागील कारण अद्यापही कळू शकले नाही.

crime

शिंगाईत येथील चेतन भोई हा संगमनेर येथे सिव्हिल इंजिनिअरिंगचे दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. दोन महिन्यापासून लॉकडाऊनमुळे चेतन गावाकडे आला होता अशी माहिती नातेवाईकांनी दिली. डॉ.आर.के.पाटील यांच्या खबरीवरून जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. घटनेमागील कारण स्पष्ट झालेले नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now