जळगाव जिल्हामहाराष्ट्र

रेशीम शेतीकडे वळतोय जिल्हातील शेतकऱ्यांचा कल !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२३ । जळगाव जिल्ह्यात रेशीम शेतीचा कल पाहायला मिळत आहेत. कारण तीन वर्षांत ११० शेतकऱ्यांवरून ३२५ शेतकऱ्यांनी रेशीम शेती सुरू केली आहे. त्यातून आर्थिक विकासही साधला आहे. शेती बेभरवशाची झाली असल्याने शेतकरी याकडे वळले आहेत.

कधी अवकाळीचा फटका, कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ, अशा एक ना अनेक समस्यांनी शेतकरी त्रासला आहे. कधी पीक येत नाही, आले तर त्यांना भाव मिळत नाही. कधी उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतित असतो. मात्र, जळगाव जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतीकडे वळला आहे.

उत्तर महाराष्ट्रात कृषी संपन्न म्हणून जळगाव जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्यातील केळी मुख्य पीक आहे. केळीसोबतच कापूस, सोयाबीन, कांदा, मका ही पिकेही मुख्यत्वे घेतली जातात. मात्र, पडणारा दुष्काळ, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलामुळे केली हो शेतकरी खचून गेला आहे. अश्यावेळी शेतकरी रेशीम शेतीकडे वळला आहे.

२०१८ ला प्रयोगीक तत्वावर ११८ शेतकऱ्यांनी सहभाग घेउन तुतीची लागवड केली होती. २०२२-२३ मध्ये २५० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. २०२३-२४ मध्ये ३२५ नोंदणी केली आहे. २०२२-२३ मध्ये जुनी लागवड १ लाख ११ हजार अंडीपुंज होती. त्याद्वारे ७५ हजार २०२ कोषांचे उत्पादन मिळाले. नवीन लागवड ११ हजार १५० अंडीपुंज झाली. ३ हजार ६२५ कोष उत्पादन मिळाले. एकूण ७८ हजार ८१७ कोष उत्पादन झाले.

Related Articles

Back to top button