जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । महसूल पथकांनी पकडलेले ट्रॅक्टर वाळूमाफियांनी पथकाच्या नाकावर टिच्चून पळवून नेल्याची घटना काल १६ रोजी दुपारी ३ वाजता नागझिरी शिवारातील गिरणा नदी पात्रात घडली. याबाबत मंडळ अधिकारी किरण खंडू बाविस्कर यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार तीन ट्रॅक्टर मालका व तीन ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंडळ अधिकारी किरण बाविस्कर (वय ४३, रा. जिजाऊ नगर वाघ नगर, जळगाव) यांच्यासह दहा जण काल १६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास नागझिरी शिवारातील गिरणा नदी पात्रात गेले असता. त्यांना वाळूने भरलेले तीन ट्रॅक्टर दिसून आले. दरम्यान, त्यांनी तेथील वाळूमाफियांना वाळू वाहतूक परवाना बाबत विचारपूस केली असता. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाळू वाहतूक परवाना मिळून आला नाही. त्यामुळे त्यांना सदर ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यलयाच्या आवारात आणायला सांगितले. मात्र, वाळूमाफियांनी ट्रॉलीतील वाळू जागीच खाली करून ट्रॅक्टरसह भरधाव वेगाने धूम ठोकली.
दरम्यान, मंडळ अधिकारी किरण बाविस्कर यांनी जळगाव तालुका पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार ट्रॅक्टरचे मालक गजानन सोनवणे उर्फ मेजर सोनवणे, देविदास ढेकडे, संदीप सपकाळे (तिन्ही रा.मोहाडी रोड जळगाव), व तिन्ही ट्रॅक्टरचे चालक नाव,गाव माहित नाही. अश्या एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तेथील पोलीस करत आहेत.