⁠ 
शनिवार, मे 18, 2024

Alert : सोनसाखळी चोरटे सक्रिय, शतपावली करणाऱ्या महिलेची पोत लांबवली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२२ । शहरात सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहे. किसनराव नगरातील दत्त मंदिराजवळ पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगलपोत दोन अज्ञात व्यक्तींनी हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील विवेकानंद नगरात सुनिता रविंद्र कापसे (वय-५१) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १० मार्च रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्या शतपावली करण्यासाठी बाहेर निघाल्या होत्या. शहरातील किसनराव नगर मधील दत्त मंदिराजवळ पायी जात असताना अज्ञात दोन भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाची १५ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत तोडून लंपास केल्याची घटना घडली होती. यासंदर्भात सुनिता कापसे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार ११ मार्च रोजी रात्री उशिरा रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.