जळगाव-धुळे रस्त्यावरील टोल नाका तोडफोड करून पेटविला ; हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद

मार्च 11, 2024 12:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२४ । जळगाव-धुळे रस्त्यावर असलेल्या टोलनाकाची बुरखाधारी तरुणांनी तोडफोड करून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला. विशेष म्हणजे संबंधित टोल नाका आजपासून सुरु होणार होता, मात्र त्यापूर्वीच झालेल्या हल्ल्याच्या घटनेने चर्चेला उधाण आले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून हल्लेखोर तरुणांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

tola naka todfod jpg webp

पारोळा तालुक्यातील सब गव्हाण गावातील अग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा हा टोल नाका होता. जळगाव-धुळे रस्त्यावर असलेला सब गव्हाण येथील हा टोल नाका आजपासून सुरु केला जाणार होता. याची सर्व तयारी झाली होती. उद्घाटन झाल्यावर हा टोल नाका वसुलीसाठी सुरु करण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच मध्यरात्री चार चाकी वाहनातून आलेल्या अज्ञात बुरखाधारी तरुणांनी टोलनाका तोडफोड करून पेटून दिला आहे.

जेव्हा ही घटना घडली त्यावेळी काही कर्मचारी टोल परिसरात झोपले होते. टोलवर आग लागल्याचं दिसताच त्यांनी पोलिसांना कळवले. या सर्व घटनेत टोल कंपनीचे अंदाजे दोन कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे. तसेच, सीसीटीव्ही कैद झालेल्या तरुणांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now