⁠ 
शनिवार, मे 18, 2024

अन् मुद्देमाल सोडून चोरटे झाले पसार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । जिल्ह्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात धार येथून दुचाकी चोरून बेटावद (ता.शिंदखेडा) येथे किराणा दुकानात चोरी करणारे, संशयित अमळनेर पोलिसांच्या हातून निसटले. परंतु चोरीची दुचाकी आणि मुद्देमाल पकडण्यात पोलिसांना यश आले. सर्व मुद्देमाल नरडाणा पोलिसांच्या ताब्यात दिला.

बेटावद येथे तीन संशयितांनी चोरी केली. त्यानंतर तिघे एकाच दुचाकीवर पळून जात होते. नरडाणा पोलिसांनी संशयितांचा पाठलाग सुरू केला. मात्र चोरटे वेगाने अमळनेरकडे पसार झाले. नरडाणा पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक शशिकांत कोळी यांनी, अमळनेर पोलिसांना संदेश पाठवला. त्यावेळी रात्रीच्या गस्तीवर पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे यांनी गलवाडे रस्त्यावर नाकाबंदी केली.

काही वेळानंतर एक दुचाकी वेगाने आली. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तिघे सुसाट निघाले. पोलिसांनी पूर्वतयारी म्हणून दुचाकी सुरू ठेवल्या होत्या. लागलीच त्यांचा पाठलाग सुरू केला. चोरट्यांची कोंडी झाल्याने त्यांनी दुचाकी (क्र.एम.एच.१९-डी.टी.४७२२) आणि चोरलेले ४५०० रुपये ठेवलेली पिशवी सोडून संशयित अंधारात पसार झाले.

हे देखील वाचा :