⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब, आजपासून तापमान वाढणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । गेल्या दाेन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी झाली असून आज शनिवारीपासून तापमानाचा पारा वाढणार आहे. आज दुपारी पारा ३५ अंशांपुढे जाण्याची शक्यता आहे. काल शुक्रवारी कमाल तापमान ३१ अंशांवर गेले हाेते. पुढील आठवडाभरात कमाल तापमानात वाढ हाेणार असल्याने उन्हाचा चटका वाढेल अशी शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरड्या हवामानाची नोंद करण्यात झाली आहे. त्यामुळे थंडीची चाहूल कायम होती. परंतु गेल्या दोन दिवसापासून राज्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी देखील वातावरण काहीसे ढगाळ हाेते. सकाळच्या वेळी ढगाळ वातावरणात काहीसे धुकेही हाेते. दुपारनंतर तापमान वाढून पारा ३१ अंशांपर्यंत गेला हाेता. येत्या आठवड्यात त्यात आणखी वाढ हाेण्याची शक्यता असून शुक्रवारी किमान तापमान वाढून १८.४ अंशांपर्यंत गेले हाेते. त्यामुळे रात्रीच्या वेळी थंडीची तीव्रता कमी झालेली हाेती.

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर केरळ ते मराठवाडादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परभणी, बीड, नांदेड आणि लातुरात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातही आज काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी देखील काही ठिकाणी सरींचा अंदाज आहे.

हे देखील वाचा :