⁠ 
सोमवार, मे 27, 2024

खुशखबर ! मान्सूनचं आगमन यंदा लवकरच, या दिवशी केरळमध्ये धडकणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२४ । सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये सूर्य आग ओकत असून वाढत्या तापमानाने उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले असून मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत आहेत. अशातच देशातील मान्सूनबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सूनचं आगमन यंदा लवकर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मान्सनसाठी यंदा अनुकूल परिस्थिती असून येत्या २१ दिवसात मान्सून केरळमध्ये धडकणार आहे. हवेचा दाब मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे पावसासंदर्भात दिलासा देणारं वातावरण लवकरच तयार होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, मान्सूनच्या तारखेबाबत अद्याप हवामान खात्याकडून माहिती समोर आली नाहीय. गेल्या दोन आठवड्यापूर्वी भारतीय हवामान खात्याने यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. 2024 मध्ये 106% म्हणजेच 87 सेमी पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तविला आहे.

त्यावेळी IMD चे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले होते की “अल निनो कमकुवत होत आहे, मान्सून सुरू होईपर्यंत तो तटस्थ अवस्थेत प्रवेश करेल,” , या वर्षी मान्सूनच्या दुसऱ्या हंगामात ‘ला नीना’ हवामानाची स्थिती विकसित होताना दिसत आहे. “भारतातील चांगल्या मान्सूनशी संबंधित ला नीना परिस्थिती ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे, असं IMD ने म्हटले आहे.