⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

सोमवारपासून आठवडाभर उन्हाचा चटका जाणवणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । मागील काही दिवसापासून राज्यासह जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. किमान तापमान 13 अंश तर कमाल तापमान अवघे 25 अंशावर असल्याने जिल्ह्यात सध्या रात्री थंडी व दिवसा देखील गारठा जाणवत आहे. दरम्यान, उद्या म्हणजेच सोमवारपासून किमान तापमानात वाढ होणार असून त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका अधिक जाणवणार आहे. आठवडाभर ही स्थिती कायम राहणार असून त्यानंतर किमान तापमानात पुन्हा घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

यंदा ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यात ढगाळ वातावरणामुळे थंडीचा कडाका काही दिवसापासून वाढला होता. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान 13 अंश तर कमाल तापमान अवघे 25 अंशावर असल्याने दिवसा व रात्री थंडी जाणवत आहे. परंतु उद्या सोमवारपासून किमान तापमानात तब्बल 33 अंशांपर्यंत वाढ होणार असल्याने दिवसा उन्हाचा चटका अधिक जाणवणार आहे.

आठवडाभर ही स्थिती कायम राहणार असून त्यानंतर किमान तापमानात पुन्हा घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तरेतील राज्यांमध्ये सध्या थंडीची लाट आलेली आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र थंडीच्या लाटेची तीव्रता कमी झालेली आहे. सोमवारपासून वातावरण निरभ्र राहणार असून तापमानातही वाढ होवू शकते. दिवसाचे तापमान 25 अंशावरून 33 अंशावर गेल्यास दिवसा उकाडा जाणवू शकतो. आठवड्याच्या शेवटी मात्र पुन्हा थंडीचा प्रभाव वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे देखील वाचा :