जळगावकरांनो बाहेर पाडण्यापूर्वी घ्या काळजी..! आजपासून ‘या’ तारखेपर्यंत तापमान आणखी वाढणार

मे 20, 2023 10:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२३ । जळगावरकांना मे हीटचा चांगलाच तडाखा बसताना दिसत असून उकाड्यामुळे जळगावकर चांगलाच हैराण झाला आहे. शुक्रवारी जळगावमधील कमाल तापमान 43.2 अंशावर गेला. तर किमान तापमान 26.5 अंशावर गेलं होते. आता आजपासून पुढील पाच दिवस तापमानाची दाहकता वाढणार आहे.

tapman 1 jpg webp

जळगावात गेल्या आढवड्यापासून उष्णतेने कहर होत असल्याचे चित्र आहे. जळगाव शहरात कमाल तापमान 43.2 अंशापर्यंत होते तर किमान तापमान 26.5 अंश सेल्सिअस पर्यंत होते. सकाळी 9 वाजल्यापासूनच अंगाला उन्हाचा चटका लागत आहे. दुपारनंतर तर सूर्यनारायण आग ओकत आहे. यामुळे दुपारीनंतर तर बाहेत पडणे कठीण झालं आहे.

सध्याच्या वाढत्या तापमानामुळे‎ शहरातील वर्द‌ळ मंदावली असून दुपारी‎ बाजारपेठेत अघोषित संचारबंदी‎ असल्यासारखी स्थिती असते.‎ आजपासून 24 मे पर्यंत तापमान 45 अंशापेक्षा अधिक असणार असल्याचा अंदाज असून हे तापमान यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान ठरेल. आवश्यकता नसल्यास दुपारी घरा बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now