⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

राज्यात उन्हाचा चटका वाढला ; तापमानात आणखी वाढ होणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२४ । गेल्या काही दिवसापासून राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक शहरांचे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेले. यामुळे उकाडा जाणवत आहे. आता होळीनंतर त्यात आणखी वाढ होणार असून यंदा देशात मार्च आणि एप्रिल महिना सर्वात जास्त उष्णतेचा असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तापमान वाढीबरोबर राज्यात हलक्या पावसाची शक्यताही आयएमडीने व्यक्त केली आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाच्या सावटामुळे जळगावसह अनेक ठिकाणी दिवसाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत होते. तसेच रात्रीचे तापमान देखील १२ अंश सेल्सिअसपर्यंत होते. यामुळे उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र गेल्या काही दिवसापासून उन्हाचा चांगला कडाका जाणवू लागला आहे. आता होळीनंतर त्यात आणखी वाढ होणार आहे.

विदर्भ मराठवाड्यात तापमान मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. वर्धा, सोलापूर, अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तपमानाची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक तापमान मालेगाव शहरात होते. मालेगावात ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यवतमाळचे तापमान ४० अंशापेक्षा जास्त होते. ब्रम्हपूरी, वर्धा, नागपूर, जळगाव शहरातील तापमान ३९ अंशावर पोहचले होते.

दरम्यान, २८ मार्चनंतर राज्यात वातावरण ढगाळ राहणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्याचे हवामान कोरडे राहील. २८ नंतर ढगाळ हवामान वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या जिवाची लाही-लाही होत आहे. उकाडा वाढू लागल्याने घरातील जुने कुलर बाहेर निघू नागरिक त्याचा वापर करताना दिसू लागले आहे. सोबतच नवीन कुलर, ए.सी. यांना मागणी वाढत असल्याचे चित्र आहे.