बेवारस इसमाच्या अंत्यविधीसाठी सरसावली माणुसकी समूहाची टिम!
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२ । माणुसकी समुह असंख्य गोरगरिबांना अहोरात्र मदत करत आलेला आहे. गेल्या आठवड्यातच एका बेवारस महिलेचा अंत्यसंस्कार सु-लक्ष्मी बहुद्देशिय संस्थेच्या सहकार्याने माणूसकी समुहा कडून पार पाडण्यात आला होता. पुन्हा एका बऱ्याच बेवारस रुग्णांचे अत्यसंस्कार माणुसकी समुहाच्या वतीने करण्यात आले आहेत.
शहरातील अजिंठा चौफुली जवळ रविवारी सायंकाळी एक बेवारस व्यक्ती बेशुद्धअवस्थेत आढळला या अनोळखी पुरुषाचा उपचारा दरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. एमआयडीसी पोलीस स्टेशन कडून मयताच्या नातेवाईकांची चौकशी केली असता त्याचे कोणीही नातेवाईक आढळून आले नाही. सदरील व्यक्ती बेवारस म्हणून घोषित झाली, त्यामुळे त्याच्या अंत्यसंस्कारासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशन ने माणुसकी रुग्णसेवा समूहाचे गजानन क्षीरसागर यांना मयताच्या अंत्यविधीसाठी कळविण्यात आले.
शासकीय रुग्णालयातील शवचिकित्सा खोली मधून मयताचे शव खाजगी ॲम्बुलन्स ने अंत्यविधीसाठी नेरी नाका स्मशानभूमी येथे नेऊन अंतिमसंस्कार करण्याचे ठरवण्यात आले.अंत्यविधीसाठी पोलीस निरीक्षक प्रतापसिंह शिकारे एमआयडीसी पोलिस स्टेशन जळगाव , से.निवृत्त डी.वाय .एस पी. सुदर्शन मुंढे , सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गायकवाड,पोलीस कॉन्स्टेबल राहुल दरडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रितम बरकले, गुणवंत सरोदे,राजू नाईक,मोहम्मद बागवान, विजय पाटील,कवी कासार, समाजसेवक गजानन क्षीरसागर, समाजसेवक सुमित पंडित, व माणुसकी समुहाच्या व्हाट्सअॕप ग्रुप मधील सभासदांनी अंत्यविधीसाठी आर्थिक मदत जमा करुन, मदतकार्य केले.