---Advertisement---
गुन्हे अमळनेर जळगाव जिल्हा पारोळा

‘त्या’ पसार संशयिताला दोन वर्षांनी केली अटक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । अमळनेर तालुक्यासह धुळे व जळगाव जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल असलेला व अट्टल दुचाकी चोर राहुल उर्फ आनंद गोपाळराव सोनवणे (वय २३, रा.लालचंदनगर, शिंदखेडा) याला २६ रोजी दुपारी शिंदखेडा येथे सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यास पारोळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

अमळनेर शहरात सम्राट हॉटेल मागून डॉ.आशिष चौधरी यांची बजाज पल्सर दुचाकी १२ ऑक्टोबर २०१९ रोजी चोरीस गेली होती. ही दुचाकी संशियत सोनवणे याने चोरली होती. तेव्हापासून संशयित पसार होता. २६ रोजी शिंदखेडा येथे संशयित येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्याने कारवाई केली.

---Advertisement---

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---