---Advertisement---
बातम्या

पैशांचा तगाद्याला कंटाळून शाळेच्या तरुण शिपायाची आत्महत्त्या, सुसाईड नोटमध्ये केला उल्लेख

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । संस्था चालकांनी पैशांचा तगादा लावल्याने त्यास कंटाळून शिपायाने आत्महत्या केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील मुडी येथील शिक्षण संस्थेत घडली होती. या प्रकरणी संस्था चालकांसह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

बदली रद्दसाठी मागितली दहा लाखांची रक्कम
अमळतेर तालुक्यातील मुडी येथील ग्रामशिक्षण मंडळाच्या सारबेटे येथील विद्यालयात तुषार भाऊराव देवरे (रा.सारबेटे) हे 2013 साली अनुकंपा तत्वावर शिपाई या पदावर रूजू झाल्यानंतर त्यांची शिरूड येथील हायस्कूलमध्ये बदली करण्यात आली. ही बदली रद्द करण्यासाठी संस्थाचालकांकडून त्यांना 10 लाखांची मागणी करण्यात आली. यात त्यांनी दोन लाख रुपये भरूनदेखील संस्थाचालकांनी पैशांचा तगादा लावला. याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली होती. तत्पूर्वी तीन चिठ्ठ्या लिहून यासाठी संचालक मंडळ जबाबदार असल्याचा आरोप केला होता.

three thousand suicides in 4 years jalgaon district jpg webp

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
दरम्यान, तुषार भाऊराव देवरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार संस्थेचे प्र. अध्यक्ष पंजाबराव पांडुरंग पाटील, संचालक जयवंतराव अमृतराव पाटील (शिरुड), कमलाकर विनेश पाटील, दीपक चंदन पाटील, शालेय समिती सदस्य शशिकांत रघुनाथ पाटील, कर्मचारी दिनेश वसंत पाटील, निवृत्त मुख्याध्यापक अनिल लोटन पाटील, सचिन संजीव काटे, शरद दयाराम शिंदे, रमेश विनायक पाटील आणि सचिव सुनील पंढरीनाथ पाटील (नाशिक) यांच्या विरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---