⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | बातम्या | मोठी बातमी! नॉन क्रीमीलेअरची मर्यादा १५ लाखांवर; राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवला

मोठी बातमी! नॉन क्रीमीलेअरची मर्यादा १५ लाखांवर; राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२४ । राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसहिंता कधीही लागू शकतात. मात्र त्यापूर्वी राज्यातील महायुती सरकारने मोठे निर्णय घेतले आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये तब्बल ८० निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये नॉन क्रीमीलेअरची मर्यादा १५ लाखांवर करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. नॉन क्रीमीलेअरची मर्यादा वाढली तर ओबीसी समाजाला मोठा फायदा होणार आहे.

नॉन क्रीमीलेअरची मर्यादा ८ लाखांवरुन १५ लाख वाढल्यानंतर ओबीसी, मराठा आणि इतर समाजातील आरक्षणाचा लाभ घेणार्‍या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. नॉन क्रीमीलेयरची मर्यादा पंधरा लाख रुपये झाली तर अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनाही याचा लाभ मिळेल.

नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र जर नसेल तर आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. आरक्षणाच्या प्रत्येक अधिनियमात नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र उमेदवाराने द्यावे, हे महत्वाचं आहे. आरक्षणाचा लाभ घेता यावा याकरिता सर्व उमेदवारांनी नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र काढावे लागते.सदर प्रमाणपत्र एका वर्षासाठी ग्राह्य धरण्यात येते. ते दर वर्षी रिन्‍यू करावे लागते.

वार्षिक उत्पन्न वाढवण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर करत तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आलाय. लोकांचे जीवनमान आणि वेतनस्तर उंचावल्यामुळे अनेक समाजातील लोकांना शैक्षणिक शुल्क सवलत असणारी आठ लाखांची मर्यादा वाढवण्याची मागमी कऱण्यात आली होती. मागील विधानसभा अधिवेशनात ही मागणी करण्यात आली होती.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.