गुन्हेभुसावळ

भुसावळातील त्या सांगाड्याची ओळख पटली : 22 वर्षीय रोहितचा झाला निर्घृण खून

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । शहरातील 22 वर्षीय तरुणाचा अज्ञातांनी निर्घृण खून करीत मृतदेह शेतात फेकल्याची घटना रविवार, 5 मे रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे गेल्या आठवडेभरापासून मयत हा बेपत्ता होता व त्याबाबत पोलिसात हरवल्याची नोंदही करण्यात आली होती मात्र बेपत्ता तरुणाचा मृतदेह दिसताच कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. रोहित दिलीप कोपरेकर (22) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत तरुणाचा खून नेमका कुणी व का केली? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

शहरातील वांजोळा शिवारातील मिरगव्हाण रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहामागे अज्ञात इसमाच्या मृतदेहाचा सांगाडा पडून असल्याची माहिती रविवारी सकाळी पोलिसांना कळाली होती मात्र हद्दीच्या वाद दोन तास वायफळ खर्ची घातल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतली. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे निरीक्षक राहुल गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश गोंटला यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेत माहिती जाणून घेतली.

पोलिसांनी धाव घेतल्यानंतर त्यांना शेतात केवळ मयताचा सांगाडा आढळला तर मृत व्यक्तीचा चेहरा व अंगावरही मांस नव्हते तर पायात चप्पल व अंगात पॅन्ट या दोनच वस्तू होते मात्र पोलिसांनी कौशल्य पणाला लावत मिसिंग रजिस्टरमध्ये नोंदवलेल्या वर्णणाद्वारे हा मृतदेह रोहित कोपरेकर याचा असल्याची ओळख पटवली. जळगावच्या फॉरेन्सीक लॅबच्या पथकाने मृतदेहाच्या अंगावरील कपडे, रक्ताचे नमुने आदी डीएनए चाचणीसाठी नमुने घेतले. रोहित हा एका दुकानात कामाला होता तर त्याला वडिल नसून घरी आई, बहिण असल्याचे सूत्रांनी सांगितले. मृतदेहाजवळ काही अंतरावर रक्ताने माखलेले दगड सुध्दा आढळल्याने मृत्यूपूर्वी आरोपी व मयतांमध्ये झटापट झाल्याची शक्यता आहे.

भुसावळ ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.शिवाजी गवळी,पंकज कोलते यांनी घटनास्थळीच मृतदेहाचे शवविच्छेदन केले.यावेळी डोक्याची कवटी पूर्ण फुटलेली होती.डोक्यात दगड मारलेले असल्याचे डॉक्टर यांनी पोलिसांना सांगितले. साधारण:पाच दिवसांपूर्वीच रोहितचा खून झाल्याचा अंदाज असून 30 मे पासून रोहित बेपत्ता असल्याची माहिती आहे तर 2 जून रोजी तो हरवल्याची नोंदही बाजारपेठ पोलिसात करण्यात आली आहे. अर्ध्या तासात घरी येतो एव्हढेच मयत रोहितचे आईशी शेवटचे संभाषण झाल्याची रोहितची आई छाया सावळेने पोलिसांशी बोलताना सांगितले.

Related Articles

Back to top button