शिंदे गटाचेही ठरलं ; शेवटच्या क्षणी निवडणूक आयोगाला ‘ही’ 3 चिन्हं पाठवली

ऑक्टोबर 11, 2022 11:28 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळाले पण अजूनही पक्षचिन्ह मिळाले नाही. त्यामुळे आता शिंदे गटाला आजच निवडणूक आयोगाकडे पर्याय द्यावे लागणार आहे. अखेरच्या क्षणी ईमेलद्वारे शिंदे गटाकडून 3 पर्यायी चिन्ह पाठवले आहे. शंख, रिक्षा, तुतारी फुंकणारा माणूस ही चिन्हं सादर केल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता निवडणूक आयोग याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

eknath shinde jpg webp

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलेली मुदत संपली आहे. दोन्ही गटांनी निवडणूक चिन्ह आणि नावांवरती तीन पर्यायाचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला होता. शिवसेनेकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि तिसरा धगधगती मशाल हे 3 चिन्ह पाठवली होती. तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी नावं सेनेनं निवडणूक आयोगाकडे पाठवली होती.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्या गटाला काल ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव देण्यात आलं असून त्यांना मशाल चिन्ह देण्यात आलं आहे. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. मात्र, शिंदे गटाला कोणतेही चिन्ह मिळू शकलेले नाही. शिंदे गटाने त्रिशूळ, उगवता सुर्य आणि गदा असे चिन्ह दिले होते. पण, आयोगाने ते रद्द ठरवले.

आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे निवडणूक पर्यायी चिन्हांचा प्रस्ताव पाठवला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मुक्त चिन्हांऐवजी नवीन चिन्हांचा पर्याय देण्याचा एकनाथ शिंदे गटाचा प्रयत्न आहे. शंख, रिक्षा, तुतारी फुंकणारा माणूस ही चिन्हं सादर केली आहे. आता निवडणूक आयोग कोणते चिन्ह देणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now