पोलिसांना पाहतांच वाळू चोर पळाले, ट्रॅक्टर जप्त
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । जिल्ह्यात वाळूचोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सर्वच नदीपात्रांमध्ये दिवसरात्र अवैध वाळू उपसा सुरू आहे. अशात आव्हाणे गावालगत असलेल्या गिरणा नदीपात्रातून वाळूचोरी करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाने पोलिसांना पाहून ट्रॅक्टर सोडून धूम ठोकली. तर गिरणा पंपिंग व नागझिरी येथील पात्रातून मात्र वाळूमाफियांकडून उपसा सुरूच आहे.
४ जानेवारी सकाळी ११ वाजता एमएच-१९, सीझेड-५०१२ क्रमांकाचे ट्रॅक्टर आव्हाणे गावाजवळून वाळूचोरी करून शहरात येत होते. यावेळी तालुका पोलिस ठाण्याच्या गस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चालकास हटकले. ट्रॅक्टरमध्ये वाळू असून, वाहतुकीचा परवाना चालकाकडे नव्हतो. ही वाळू चोरीची असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी चालकास संबंधित ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात घेऊन येण्यास सांगितले; परंतु चालकाने ट्रॅक्टर जागेवरच सोडून धूम ठोकली. अखेर पोलिसांनी हे ट्रॅक्टर जप्त केले. पोलिस कर्मचारी अनिल तायडे यांच्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टरचालकाच्या विरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल फेगडे पुढील तपास करीत आहेत.
हे देखील वाचा :