खळबळजनक : एका महिलेसह दोन तरुणी व दोन तरुण बेपत्ता!

जुलै 24, 2022 1:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२२ । जिल्ह्यांसह विविध तालुक्यातून पाच जण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एरंडोल, जामनेर, मुक्ताईनगर व फैजपूर पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

missing jpg webp

देविदास छगन मदाने (वय ३२, रा.जामनेर पुरा जिजाऊ नगर, जामनेर) यांनी जामनेर पोलिसांत फिर्याद दिली आहे. मदाने हे आपल्या कुटुंबियांसह सदर ठिकाणी वास्तव्यास आहे. त्यांची पत्नी दीपिका देविदास मदाने (वय ३०) या घरात कुणास काही न सांगता कुठे तरी निघून गेल्या. दरम्यान, तिचा सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु, त्या कुठेही मिळून न आल्याने पती देविदास मदाने यांनी पोलिसांत हरविल्याची तक्रार दिली. पुढील तपास पोलिस अंमलदार करत आहेत.

सुधाकर कडू कोळी (वय ५२, रा. शिवाराय नगर, मुक्ताईनगर) यांनी मुक्ताईनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. कोळी यांची मुलगी मोनिका ही तिच्या मोठ्या बहिणीला कटलरी सामान घेऊन येते असे सांगून गेली. ती अद्याप पावतो न आल्याने कोळी यांनी पोलिसांत हरविल्याची तक्रार दिली. पुढील तपास पोलिस अंमलदार करत आहेत. दिनकर पुंडलिक पाटील (वय ४२, रा . उमर्दे एरंडोल) यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिली. पाटील हे सदर ठिकाणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचा मुलगा पंकज दिनकर पाटील हा काही न सांगता घरातून निघून गेला. तो अद्याप पावतो न आल्याने पाटील यांनी पोलिसांत हरविल्याची तक्रार दिली. पुढील तपास पोलिस अंमलदार करत आहेत.

चांदनी गोपाल जुगर (वय २२, रा. नेरी जामनेर) यांनी फैजपूर पोलीसांत फिर्याद दिली. चांदनी हिचे पती गोपाल कैलास गुजर हा घरात कुणास काही न सांगता कुठे तरी निघून गेला. त्याचा सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु. तो कुठेही मिळून न आल्याने पत्नी चांदनी हिने पोलिसांत हरविल्याची तक्रार दिली. पुढील तपास पोलिस अंमलदार करत आहेत. धर्मचंद भालेराव यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांची मुलगी निकिता भालेराव ही घरात कोणास काही न सांगता कुठे तरी निघून गेली. तिचा सर्व नातेवाईकांनीकडे शोध घेतला. परंतु, ती कुठेही मिळून न आल्याने भालेराव यांनी पोलिसांत हरविल्याची तक्रार दिली. पुढील तपास पोलिस अंमलदार करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now