⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार रोटरी उत्सवाचे उद्घाटन

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार रोटरी उत्सवाचे उद्घाटन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । चोपडा येथे रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे शहरात भव्य अशा रोटरी उत्सवाचे आयोजन दि २९ रोजी करण्यात आले आहे. उत्सवाचे उद्घाटन सायंकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते होणार आहे.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी हे असून प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार लता सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार जगदीशचंद्र वळवी, माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी नगराध्यक्षा मनीषा चौधरी, इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन अश्विनी गुजराथी, उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला चोपडा शहर तालुक्यातून मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज बोरोले, रोटरी उत्सवाचे प्रोजेक्ट चेअरमन अँड. रुपेश पाटील, सचिव प्रवीण मिस्त्री, चेतन टाटीया यांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.